Prakash Ambedkar .jpg
Prakash Ambedkar .jpg 
मुख्य बातम्या मोबाईल

आंबेडकरांची मोठी घोषणा; तीन महिने पक्षापासून दूर राहणार

सरकारनामा ब्यूरो

अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे. आपल्या वैयक्तीक कामासाठी पक्षाच्या दैनंदिन कामकाजातून तीन महिन्यासाठी दुर राहणार असल्याचे म्हटले आहे.  ( Prakash Ambedkar's big announcement )    

या संदर्भात बाळासाहेब आंबेडकर यांनी व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये आंबेडकर म्हणाले की ''मी स्वतः पक्षाच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये कार्यरत राहणार नाही. माझ्या वैयक्तीक कामासाठी तीन महिने कार्यरत राहणार नाही. पक्ष चालला पाहिजे. आंदोलनाची आपण सुरुवात केली आहे. पाच जिल्ह्यात निवडणुका आहेत. आणि म्हणून पक्षाला अध्यक्ष असला पाहिजे. यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षपदी रेखा ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र कमिटी त्यांना सहकार्य करेल'', असे आंबडेकर यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, आंबेडकर यांच्या या घोषणेनंतर विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रकाश आंबेडकर यांनी असा निर्णय का घेतला असा सवाल वंचीतच्या कार्यकर्त्यांकडून विचारण्यात येत आहे. 

हेही वाचा :

एकनाथ खडसे आज ईडीच्या चैाकशीला उपस्थित राहणार का? 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने ते आज ईडीच्या कार्यालयात चैाकशीसाठी उपस्थित राहणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. भोसरी येथील जमीन गैरव्यवहारप्रकरणी काल ईडीनं खडसे यांना समन्स बजावले आहे. त्यांना आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितले आहे.  

एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत टि्वट करुन ही माहिती दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत खडसे काय नवीन माहिती देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.   

एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चैाधरी यांना ईडीने काल सकाळी अटक केली आहे. परवा रात्रभर त्याची ईडीकडून कसून चैाकशी केली जात होती. काल सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. भोसरी जमिन गैरव्यवहारप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 
Edited By - Amol Jaybhaye 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT